सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूरच्या “या’ अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनिसांना पुरस्कार जाहीर

महिला दिनानिमित्त सोलापूर झेडपीचा आनंददायी उपक्रम

सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन 2024-25 मधील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनिसांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आठ मार्च रोजी जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो यंदाही हा कार्यक्रम आठ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडीसाठी काम करणाऱ्या पुढील कर्मचाऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पर्यवेक्षिका :

महादेवी देवकते ( करजगी, अक्कलकोट ), भागीरथी मुंढे (पानगाव, बार्शी ), सुलताना शेख (उपळे दुमाला, बार्शी ), अनुराधा मिस्किन (रोपळे, माढा ), इंदुमती पाटील (पिंपळनेर, माढा ), पी. ए. सोरटे ( फोंडशिरस, माळशिरस), ए.ए.शिंदे (आंधळगाव, मंगळवेढा), सुप्रिया पवार (शेटफळ, मोहोळ), अनिता जिंदम (वडाळा, उ. सोलापूर ), वसुंधरा दिंडोरे (कंदलगाव, दक्षिण सोलापूर ), एस. जी. कुलकर्णी (माळीनगर, अकलूज ), वंदना चोले (वरकुडे, करमाळा), एस. आर. सूर्यवंशी (कासेगाव),  रुक्मणी बेसुळके (तुंगत, पंढरपूर).

अंगणवाडी सेविका 

अक्कलकोट: शिवनिंगव्वा हत्तरसंग (करजगी), सुंदर कदम (दोड्डयाळ ), अलमास शेख (अंकलगे), बार्शी : आशा गात (गाताचीवाडी), जनाबाई गवारे (शिराळे), सारिका मोरे (पानगाव ), वैराग : वैशाली देवकते (इर्ले ), शामल कळम्ब (संगमनेर ), माढा : सुप्रिया चव्हाण ( सुवेवस्ती ), कलावधी कवडे ( बुद्रकवाडी ), टेंभुर्णी : लता टकले (चांदज), अंजना मोरे (उपळवाटे), आशा मुडके (टेंभुर्णी), माळशिरस: शीतल सोरटे (नातेपुते), सुवर्णा बोडरे (जळभावी), आशा अवघडे (वेळापूर), मंगळवेढा: ज्योती गायकवाड (मंगलनगर) मीनाक्षी रणदिवे (कळकुंबेवस्ती), वालुबाई पवार (बालाजीनगर), मोहोळ: अनिता भुसे (औंढी ), रंजना डोंगरे (कोन्होरी),  स्वाती क्षीरसागर (बिटले), उत्तर सोलापूर:  रजनी माळी (मार्डी), सुज्ञानी राऊत (हिप्परगा),  मीनाक्षी झुंजकर (वडाळा), दक्षिण सोलापूर : प्रियांका जाधव (उळे), सुनीता कोळी (दर्गणहळी), संध्या प्रधान (औज -आहेरवाडी), अकलूज:  कविता बाबर (शंकरनगर), जयश्री निकम (आनंदनगर), सुमन पवार (खंडाळी ), कोळा : अनुसया घाटुळे (नाझरे), सुनंदा माळी (कोळा), शामल साळुंखे (जवळा), करमाळा: रोहिणी देवकर (वरकटे), सुनीता रसाळ (वडगाव), तेजस्विनी घोडके (बिटरगाव), सांगोला: नागर होवाळ (चिंचोली), पल्लवी मोरे (मोटेवाडी), विद्या ठोकळे (खांडेकरवस्ती), पंढरपूर:  के.जी. शेख (इंदिरानगर) के. के. मोरे (हनुमाननगर),  एस. आर. शेळके (तरटेवस्ती), गायत्री महाडिक (घाटोळेवस्ती), स्मिता डुबल (अर्जुनसोंड), उमा चव्हाण (चव्हाणवस्ती).

अंगणवाडी मदतनीस… 

अक्कलकोट: रुक्मिणी शिरसाड (हैदरा), नागम्मा गायकवाड (जेऊर), लक्ष्मी गवंडी (करजगी), बार्शी: ज्योती कदम (कदमवाडी), इंदुमती गात (भोयरे), जयश्री चंदनशिवे (उक्कडगाव), वैराग: विजया वाकळे (धामणगाव), कस्तुरी टोळसे (सर्जापूर), मीनाक्षी शिरसट (नांदणी), माढा: सोनाली कोळी (मोरेवस्ती मुंगशी), सुरेखा जाधव (अंजनगाव खे ), सत्यभामा शिंदे (सुलतानपूर), टेंभुर्णी: वैशाली बोरकर (भुईंजे),वेणूबाई शिरतोडे (अकोले बुद्रुक), साखरबाई जगताप (जगतापवस्ती), माळशिरस: रेणुका जाधव (मोरोची), रतन लोहार (बजेरी), शोभा भाग्यवंत (तोंडले), मंगळवेढा: राणूबाई होनमुखे (मारोळी), उषाबाई रायबान (शरदनगर), सुजाता कोळी (कोळेवाडी), मोहोळ: रोहिणी जाधव (गोटेवाडी), सुनीता राऊत (पाटकुल), बाई चव्हाण (देवडी), उत्तर सोलापूर: ताराबाई माने (पाकणी), प्रियांका पाटील (मार्डी), ताराबाई राठोड (तिऱ्हेतांडा), दक्षिण सोलापूर: श्रीदेवी ख्याडे (मंद्रूप), शीतल उडानशिव (कंदलगाव), रीमा कदम (भंडारकवठे), अकलूज: विजया सुरवसे (बोरगाव), आयेशा तांबोळी (अकलूज), मंगल भंडारे (शंकरनगर), कोळा: मंगल माळी (जवळा), इंदुमती धायगुडे (नाझरे), मंगल गोसावी (जवळा), करमाळा: सलमा शेख (उमरडवस्ती), दिपाली जाधव (राजुरी), ताई बोराडे (केडगाव), सांगोला: शोभा माने (बाबरवाडी), जयश्री कांबळे (ढोलेवाडी), राणी बिले (मोरेवाडी), पंढरपूर: एस. बी. भाकरे (पाटीलवस्ती), ए. एस. अनपट (खोरेवस्ती), एम. आर. जाधव (विवेकनगर), संगीता शिंगाडे (पत्राशेड), भामा दाहिंजे (सुलेपूर्व), पद्मिनी राऊत (चिंचोली भोसे).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button