सोलापूर झेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाच जमा झाली एक तारखेला पेन्शन
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व सेवानिवृत्तीधारकांचे ऑगस्टचे निवृत्ती वेतन 1 सप्टेंबर रोजी करून सेवानिवृत्तीधारकांना दिलासा दिला आहे. याबद्दल पेन्शनर संघटनेने सिईओ आव्हाळे यांची बुधवारी भेट घेऊन पत्राद्वारे आभार मानले आहेत.
पेन्शनवर गुजराण असलेले कर्मचारी दरमहा पेन्शन बँक खात्यावर जमा होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात . सीईओ मनिषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यावर प्रशासन गतीमान करून दरमहाच्या १ तारखेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मानधन कसे जमा होईल यादृष्ट्रीने नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे ऑगस्टचे सेवानिवृत्ती वेतन सप्टेंबरच्या 1 तारखेला बँक खात्यावर जमा झाले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात कधीही 1 तारखेला पेन्शन जमा झालेली नाही. नेहमी 9 ते 10 तारखेला निवृत्ती वेतन होत असे. सीईओ आव्हाळे यांना सेवानिवृत्तीधारकाविषयी दाखविलेल्या सहानुभूतीमुळे सेवानिवृत्तीधारक मनोमन सुखावला आहे, असे मत सेवानिवृत्त कर्मचारी व्ही. आर. गरड, पी.एन. शेटे, एस. बागेवाडी व एम.ए. शेख यांनी व्यक्त केले.