सोलापूरकलाशिक्षण

आयएमएस स्कूलच्या स्नेहसंमेलनात साकारला छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

सोलापूर : इंडियन माॅडेल स्कूल व सीबीएसईचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी मंचावर सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सादरीकरणाला उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली.

यावर्षीच्या स्नेहसंमेलनात एकूण 2000 विद्यार्थ्यांंनी सहभाग नाेंदवला. या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण “’शिवाजी महाराज राज्याभिषेक साेहळा” हे हाेते. यात इयत्ता 7 वी च्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला. प्रत्यक्ष घाेड्यावर शिवाजी महाराजांचे आगमन झाले. तसेच शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखविण्यात आले.यात शिवजन्म साेहळा, शिवरायांचे बालपण, शिवरायांची स्वराज्य स्थापनेची शपथ, शिवाजी महाराज अफजलखान भेट, आग्ऱ्याहून सुटका, शाहिस्तेखानाचा पराभव या ऐतिहासिक प्रसंगांचे हुबेहुब सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. याचसाेबत विद्यार्थ्यांनी कृष्णलीला नाटिका, वंदेमातरम, फेदर डान्स, मीरा थिम डान्स, ताेबा-ताेबा, अंब्रेला डान्स अशा विविध नृत्यांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. वडील व मुलगी यांचे नाते संबंध दृढ करणारा प्रसंग फादर डॉटर थीम मधून दाखवण्यात आला.

याचसाेबत इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींनी नवदुर्गा गाण्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचे उत्कृष्ट सादरीकरण केले . यामध्ये हावभाव, वेशभूषा, शस्त्र इत्यादींंचे हुबेहुब सादरीकरण हाेऊन नवरसांची निर्मिती केली गेली व कलात्मक पद्धतीने रंगभूषा करण्यात आली. स्नेहसंमेलनप्रसंगी प्रशालेचे संस्थापक ए.डी.जाेशी, सचिव अमोल जाेशी, सचिवा सायली जाेशी,जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, न्यायाधीश भंडारी, कुंभोजकर, अश्विनी करमाळे, उमेश देवर्षी, सुजाता रतकंठवार, आमदार देवेंद्र कोठे, पत्रकार नितीन फलटणकर,उपनिबंधक किरण गायकवाड, पुण्यनगरीचे  विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, संजयकुमार राठोड, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, सुजाता बुटटे, अचला राचर्ला, ममता बसवंती, रुही काझी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button