
सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजातील दुसऱ्या फळीतील तरुण कार्यकर्त्यांनी बुधवारी जनवासल्यवर येऊन काठी आणि घोंगडं भेट देऊन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुसऱ्या फळीतील धनगर समाजातील तरुण कार्यकर्ते सुभाष पाटोळे याच्या नेतृत्वाखाली गांधीनगरातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले. माजी सभापती बाळासाहेब पाटील याच्या अध्यक्षतेखाली दक्षिण तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक झाली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत जनवात्सल्यपर्यंत पदयात्रा काढली. जनवासल्यावर या तरुणांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. या दोघांचा काठी अन् घोंगडी देऊन धनगरी पध्दतीने सत्कार करुन पाठींबा जाहीर करण्यात आला. यावेळी कुरघोट सोसायटीचे चेअरमन बनसिधद बन्ने, हत्तुरचे शिवानंद पाटील, माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे चिरंजीव अशोक देवकते, राहुल देवकते, श्याम व्हनमाने (कंदलगाव), महेश पाटील (दोडडी), आमसिधद थोरात (माळकवठा), चितापुरेसर (सादेपुर), आकाश पुजारी (भंडारकवठे), बापु गावडे, सचिन पडोळकर, सिध्दाराम धायगुडे, (तिलहेहाळ), श्रीशैल बंडगर, शिवाजी काबळे, प्रकाश कोकरे, अप्पू माने (निंबर्गी), नाना करपे (अंत्रोळी), अभिमान पाटील व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुसऱ्या फळीतील धनगर समाजाचे तरुण कार्यकर्ते स्वतःहून काँग्रेसकडे येत आहेत, ही समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या तुमचे काय पण काम असेल तर मला संपर्क करा मी काम करेन व तुम्ही मला पाठींबा दिल्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.