
सोलापूर : श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ झेडपीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे व मुंबईतील भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांच्यातर्फे यात्रेकरुना पिण्याच्पा पाण्याची सोय करण्यात आली.
गोडसे परिवारातर्फे दरवर्षी यात्रेतील भाविकांसाठी सेवा पुरवली जाते. कुणाच्या कडाक्यात यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासते. भाविकांचे गरज ओळखून ग्रामीण पाणीपुरवठा विभागात काम करणारे अविनाश गोडसे यांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी उचलली आहे. याला त्याचे बंधू साहेब पोलीस निरीक्षक सतीश यांनीही मोलाचे साथ दिली आहे. यंदा यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना मोहोळचे गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, बप्पा देशमुख, कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड यांच्याहस्ते पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी सुनील गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे,श्लोक गोडसे, जान्हव्ही गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, सोमेश्यर शेंडे, राजेश देशपांडे, प्रसाद देवळे, विलास पाटील,दिगंबर व्होनमाने, बाहुबली खiडेकर आदी उपस्थित होते. या सेवेबद्दल यात्रेकरूनी गोडसे बंधूचे आभार मानले आहेत.