सोलापूर

हत्तूरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात चारजण जखमी

स्फोटामुळे घराचे झाले मोठे नुकसान

सोलापूर: गॅसवरची शेगडी पेटवता असताना अचानक मोठा स्फोट होऊन चौघे गंभीररित्या भाजले. सोमवारी सकाळी ६ च्या सुमाराला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्ध असे चौघेजण भाजून जखमी झाले आहेत. जखमींना ताततडीने येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोनाली महादुलिंग बबुरे (वय- २८), आरुषी महादूलिंग बबुरे (वय ३), मलकारीसिद्ध सिद्धप्पा बबुरे (वय- १) आणि शावरसिद्ध सिद्धप्पा बबुरे (वय- ७०, सर्व रा. हत्तूर) असे भाजलेल्या चौघांची नावे आहेत. हत्तूरमधील मड्डीवस्तीत राहणाऱ्या बबुरे कुटुंबात सोमवारी सकाळी स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट झाला. यातील सोनाली या सकाळी सहाच्या सुमारास दररोजच्याप्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. गॅस शेगडीचा कॉक चालू करुन गॅस पेटवताना अचानक मोठा स्फोट झाला. काय होतेय हे समजण्यापूर्वीच आगीचे लोळ उठले. यात स्वत: सोनाली यांच्यासह तीन वर्षाची आरुषी आणि एक वर्षाचा मलकारीसिद्ध अशी दोन मुलं आणि ७० वर्षाचे वृद्ध शावरसिद्ध हे भाजले गेले. यातील चौघांपैकी सोनाली यांच्या चेहऱ्यास, हातास, पाठीला भाजले आहे तर आरुषी हिच्याही चेहऱ्यासह दोन्ही पाय भाजले आहेत. एक वर्षाच्या शावरसिद्ध याचे हात,पाय, चेहरा गंभीररित्या भाजला आहे. वृद्ध असलेले शावरसिद्ध यांना चेहऱ्याला व दोन्ही हाताला भाजले आहे.चौघांनाही तातडीने जवळच असलेल्या खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून सिलसिद्ध बबुरे यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्वांवर उपचर सुरु असून, ते शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button