जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून सीमा होळकर यांनी पदभार घेतला

सोलापूर: महिला दिनाच्या पूर्व संध्येला नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी पदभार घेतला. त्यांचे स्वागत सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने करण्यात आले.
स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सीमा होळकर यांचे स्वागत रेशन दुकानदार संघटनेचे सुनील पेंटर यांनी केले. यावेळी तालुक्यातील दुकानदारांचे कमिशन वेळेत मिळावे, विना आधार कमी झालेल्या कार्डांचा इष्टांक पूर्ण व्हावा, प्राधिकारपत्र नूतनीकरण करून मिळावे आदी प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावर नूतन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू,असा विश्वास दिला.यावेळी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख,उमेश आसादे,पंचकमिटी सदस्य शिवशंकर कोरे,बापू गंदगे,अभिजित सडडो, बसवराज बिराजदार, जुबेर खानमिया, हर्षल गायकवाड, मोहोळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,अक्कलकोट तालुकाध्यक्ष राजशेखर चौधरी,बार्शी तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, माळशिरस तालुकाध्यक्ष दयानंद शेळके,पंढरपूर तालुकाध्यक्ष शरद पवार,उत्तर तालुका उपाध्यक्ष आदिनाथ कांबळे,विजय अवताडे, सचिन भिंगारे,सर्व जिल्हा संघटक, जिल्हा व तालुका पदाधिकारी सहजिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते.