
सोलापूर : महापालिकेकडून शहर पाणीपुरवठा नियोजनासंबंधी सूचना होणार SMS द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकामधे विद्युत पुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड व तअनुषंगिक कारणामुळे बदल होतो. या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने यासंबंधी सूचना SMS द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी खालीलप्रमाणे नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा –
1) jalsuvidha.solapurcorporation.org या वेबसाईटवर आपल्या घराचा कर आकारणी मिळकत क्रमांक टाकून नोंदणी करावयाची आहे.
2) नोंदणी करताना मोबाईल नंबर व आपल्या घराचा GeoTag फोटो अपलोड करावा.