सोलापूरक्राईम

सोलापूरला येणारे एम राजकुमार आहेत तरी कोण?

नव्या पोलिशिंगला असतील ही आव्हाने

सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने बुधवारी वरिष्ठ 58 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यात सोलापूरला एम राजकुमार हे नवीन पोलीस आयुक्त बदलून येत आहेत. एम राजकुमार आहेत तरी कोण? अशी चर्चा आता सोलापुरात सुरू झाली आहे.

पोलीस अधिकारी बदलले की पोलीस कर्मचाऱ्यात नवा येणारा अधिकारी कसा आहे, याबाबत उत्सुकता असते. सोलापूर पोलीस आयुक्तालयाचा इतिहास तर मोठा आहेच. ‘शोलापूर”ला सोलापूर करणारे शहीद माजी पोलीस आयुक्त अशोक कामटे, अहमद जावेद, डॉ. भूषणकुमार उपाध्याय,रविंद्र सेनगावकर, अंकुश शिंदे, कमी कालावधी पाहिलेले हिरेमठ यांच्यापासूनचा इतिहास पाहिला की त्यांच्या डॅशिंग पोलीशिंगची आठवण सोलापूरकरांना आल्याशिवाय राहत नाही. अशात आता  एम राजकुमार हे नवे पोलीस आयुक्त येणार अशी बातमी सोलापूरकरांना मिळाली आहे. हे नाव ऐकले की सर्वांना वाटते ते दाक्षिणात्य असावेत. पण त्यांचा बायोडाटा पाहिला की राजकुमार यांचा जन्म नागपुरात झाला आहे. सन 2010 च्या आयपीएस बॅचचे ते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत नागपूर शहर उपायुक्त, नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक, यवतमाळला अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक म्हणून चार वर्षे सेवा केली आहे. जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतला. या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली. नाशिक परिक्षेत्राच्या क्रीडा स्पर्धा त्यांनी व्यवस्थितपणे नुकत्याच पार पाडल्या आहेत. या  क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी जळगाव पोलिसांना यश मिळवून दिले आहे. ते एक उत्तम खेळाडू म्हणून या कारणाने परिचित झाले. या कार्यक्रमात त्यांनी कुटुंबासह पोलिसांबरोबर संवाद साधला. कर्तव्य कठोरता व कुटुंबप्रिय अशी ओळख त्यांच्या कार्याची आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात दहशतवादी गुप्तचर शोधून काढले. सायबर सुरक्षा हा त्यांचा आवडता विषय असून याविषयी अभ्यासाची नऊ प्रमाणपत्र त्यांनी मिळवली आहेत. सोलापुरात ते पदोन्नतीने पोलीस आयुक्त म्हणून येत असून शहरातील ‘वाहतूक व्यवस्था” हा त्यांच्यासमोर आव्हानाचा विषय असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button