सोलापूर विद्यापीठाच्या ‘या” निर्णयाचे होत आहे स्वागत

सोलापूर, : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नूतन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे अभियंत्रिकी, विधी तसेच विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी कॅरीऑन सुविधेचा लाभ मिळण्यासाठी मागणी केली होती. विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या मागणीनुसार सर्व विद्याशाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन योजनेअंतर्गत लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आता सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑनचा लाभ देण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. गठित समितीकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार कॅरीऑन योजनेअंतर्गत लाभ देण्यास अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. महानवर यांनी दिली. कुलगुरू महानवर यांनी विद्यार्थी हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे यांनी स्वागत केले आहे.