सोलापूर
सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डी. के. पाटील यांची साताऱ्याला बदली
डॉ. सुहास माने नवे जिल्हा शल्य चिकित्सक

सोलापूर: राज्याच्या आरोग्य विभागातील उपसंचालक संवर्गातील १२ अधिकाऱ्यांच्या नव्याने पदस्थापना करण्यात आल्या आहेत.
पुणे आरोग्य मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. राधाकिशन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांची सातारा येथील सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्राच्या रिक्त वैद्यकीय अधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी मुंबईतील डॉ. सुहास माने यांची नियुक्ती झाली आहे.