सोलापूर झेडपी कर्मचारी ‘या” पतसंस्थेच्या कामाचे झाले कौतुक

सोलापूर : आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या क्र. 2 या संस्थेने मोठा आधार देऊन दिलासा दिला आहे. या पतसंस्थेचे हे काम असेच निरंतर चालू राहावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी व्यक्त केले.
पतसंस्थेच्या सन 2024 सालाची दिनदर्शिका प्रकाशन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी संदिप कोहिणकर व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांचेहस्ते पार पडले. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचा शाल व गुच्छ देऊन संस्थेचे मार्गदर्शक व लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबासाहेब करांडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन रणजीत घोडके, व्हाईस चेअरमन प्रकाश बिराजदार, मानद सचिव सुनंदा जाधवर, खजिनदार विलास माने, संचालक शिवराज जाधव, गिरीश जाधव, सुधाकर माने- देशमुख, श्रीकृष्ण घंटे, श्रीकांत धोत्रे, श्रावण मोरे, राणी सुतार, सतीश लोंढे, महेश रुपनर, विजया राऊत, यांच्यासह कनिष्ठ सहाय्यक सोमलिंग बोरगे, उमाकांत शहापूरकर, सचिव बापूराव जगताप आदी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी दोन नंबर पतसंस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत यापुढेही सभासदांचे हित जोपासावे असे आवाहन केले.