March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होणार सोलापुरात रोड शो

सोलापूर : सोलापूर दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरातील व्हीआयपी रोडवर रोड शो होणार आहे.

रे नगर घरकुलातील 15 हजार लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. भाजप व जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात येत आहे.  रे नगर येथील कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सोलापूर विमानतळ ते कुंभारी येथील रस्ता चकाचक करण्यात आला आहे.  सोलापूर लोकसभा निवडणूक डोळ्यावर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याचे मार्केटिंग करण्याचेही भाजपने ठरविले आहे भाजपने पोलिसांकडे व्हीआयपी रोडवर पंतप्रधानाचा रोड शो करण्याची परवानगी मागितली आहे. त्यानंतर आता महापालिका व जिल्हा प्रशासनामार्फत व्हीआयपीरोडवरील स्वच्छतेला प्रारंभ झाला आहे. दुभाजकातील घाण व स्ट्रीट लाईट वर लटकलेल्या वायरी, जाहिरातीचे फलके काम काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. व्हीआयपी रोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरात जोरदार रोड शो होणार आहे. यामुळे सोलापूरकरांना पंतप्रधान मोदी यांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.