सोलापूरराजकीय

सुशीलकुमार शिंदे म्हणाले भाजपची ऑफर पण कोणी दिली विचारू नका

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मला भाजपने ऑफर दिली होती पण ती कोणी दिली हे नाव विचारू नका,  असे स्पष्टीकरण बुधवारी प्रसार माध्यमांनीशी बोलताना दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मला भाजपचे ऑफर होती असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे सोलापुरात दाखल झाले आहेत. नाट्यसंमेलनाचे स्वागत अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील निमंत्रणासाठी मा जी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या घरी जाणार या चर्चेने राजकीय वर्तुळात या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

ठरल्याप्रमाणे बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी 100 व्या नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी शिंदेसाहेब तुम्हाला नाट्यसंमेलन आयोजनाचा मोठा अनुभव आहे. सोलापूरमध्ये होत असलेल्या 100 व्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आपण प्रमुख पाहुणे म्हणून यावे असे आग्रहपूर्वक निमंत्रण दिले. त्यांच्यासमवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरमध्ये 20 ते 28 जानेवारी यादरम्यान होणार आहे. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा,सांगोला, अकलूज आणि बार्शी या नाट्य परिषदेच्या शाखांकडून या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असून मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत हे आहेत. सोलापूरमध्ये होत असलेल्या  विभागीय नाट्यसंमेलन मोठ्या उत्साहात आणि सर्वांना सामावून घेऊन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये यापुर्वी 88 वे मराठी नाट्यसंमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळेच यंदाच्या या नाट्यसंमेलनात त्यांनी सहभाग घ्यावा आणि नाट्यसंमेलनाला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावे यासाठीच स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सातरस्ता येथील जनवात्सल्य या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले. त्यांच्याशी चर्चा करून नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आणि नाट्यसंमेलनाला येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान पालकमंत्री पाटील यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्याचे ही कौतुक केल्याचे सांगण्यात आले.

या भेटीनंतर पत्रकारांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आम्ही ऑफर  नाही असे स्पष्ट केले असल्याचे विचारल्यावर शिंदे यांनी मला ऑफर कोणी दिली हे नाव सांगायचे नसते असे उत्तर दिले. काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे आमदार प्रणिती शिंदे हे काय निर्णय घेतील हा त्यांचा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरलोच आहोत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,  जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button