सोलापुरात जल पुनर्भरणाच्या कामावर भर देणे आवश्यक
स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवाकडून सारोळे येथील कामाची पाहणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे समाधान कारक आहेत. या कामांना गती द्या. भूजल पातळी खोल जात असलेने पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करा, असे आवाहन राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील जलजीवन मिशन अंतर्गत रिचार्ज शाफ्ट केलेल्या सात कामांची पाहणी प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केली. याप्रसंगी. भूजल सर्वेक्षण विभागाचे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डाॅ. मुश्ताक शेख, उप अभियंता वसीम शेख, कनिष्ठ भूवैज्ञानिक अनिता बनसोडे उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील सारोळे हा भाग टंचाई क्षेत्रात येत आहे. या पार्श्वभुमीवर सारोळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पुनर्भरणाची कामे हाती घेणेत येत आहेत. या कामामुळे स्त्रोत बळकटीस मदत होत आहे. या विशेष कामांची पाहणी आज प्रधान सचिव खंदारे यांनी केली.
जलजीवनचा स्पीड वाढवा
प्रधान सचिव संजय खंदारे यांचे स्वागत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डाॅ. मुश्ताक शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.जिल्हयात सीईओ मनिषा आव्हाळे यांनी वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे सर्व कामे सुरू होऊन प्रगती पथावर असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले. प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सोलापूर जिल्ह्यत सुरू असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. कामांचा स्पीड वाढवा अशा सूचना त्यांनी केल्या.