
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसच्या सभेत वेगळ्या लुक मध्ये दिसले आहेत. काठी न घोंगड त्यांनी नागरिकांना दाखवताच एकच जल्लोष झाला आहे.
माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची माळशिरस येथे जाहीर सभा सुरू झाली आहे. मोदी यांनी डोक्यावर पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन मंचावर प्रवेश करताच उपस्थित यांनी एकच जल्लोष केला आहे. सभेला महिलांचीही मोठ्याप्रमाणात उपस्थिती आहे. उन्हात व लांबून आलेल्या महिला व कार्यकर्त्यांची मोदी यांनी दखल घेतली आहे. काँग्रेस गरीबीबाबत करीत असलेल्या ढोंगीपणाबाबत त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. दहा वर्षात झालेल्या पालखी मार्ग व पंढरपूर विकासाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. विदर्भ व मराठवाड्याला थेंब थेंब पाण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी तरसावले आहे. काँग्रेसला 60 वर्षे विकास कामाची संधी होती. पण त्यांनी काहीही केलेले नाही. 2014 नंतर खरा विकास सुरू झाला, महाराष्ट्रात सिंचनाच्या 26 योजना सुरू केल्या. शेतामध्ये पाणी पोचविण्याचे काम आम्ही केले, असे मोदी यांनी म्हटले आहे.