सोलापूर : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील प्र.क्र.३ हा भाजपचा गड असलेल्या परिसरात महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग  शनिवारी सकाळी उस्फुर्तपणे पदयात्रा निघाली. या प्रभागात आमदार देशमुख यांच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधा करिता कोट्यावधींची विकास कामे झाली असून भाजपचा गड असलेल्या भागात भरघोस निधी दिल्यामुळे मतदानही भरघोस होईल असा विश्वास माझी सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमदार देशमुख यांच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधाकरिता  कोट्यावधींची विकास कामे झाली असून भाजपचा गड असलेल्या भागात भरघोस निधी दिल्यामुळे मतदानही भरघोस होईल असा विश्वास माझी सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केला.

ढोर गल्ली दाळगे प्लॉट शाहीर वस्ती भवानी पेठ मुनाळे बोळ आणि प्रभाग तीन मधील उर्वरित भागात आमदार देशमुख यांनी निधी दिल्यामुळे या भागाचा कायापालट झालाय अनेक वर्षापासून समस्या येथे सुटल्यामुळे हा भाग भाजपचा गड मानला जातो. येणाऱ्या निवडणुकीत शहर उत्तर मध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचा संकल्प या भागातील भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब आळसंदे, राजाभाऊ गायकवाड, नागेश येळमेली आणि श्रीकांत हवळगी यांनी व्यक्त केला.या पदयात्रेमध्ये अजित गायकवाड, जागृती माता संस्थेचे ट्रस्टी सिद्धू गुब्याडकर, गौतम कसबे, वीरेश गुंडगे, शिवानंद साबळे गुरुनाथ बडूरे, प्रेम भोगडे आदीं सहभागी होते.

प्रभाग क्रमांक सात भाजपमय 

  • २४८, विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धरमसी लाईन,मनोहर नगर ,उमा नगरी,अभिषेक नगर,जुनी पोलीस लाईन आणि प्रभाग क्रमांक सहा येथे शुक्रवारी सायंकाळी पदयात्रेच्या आयोजन करण्यात आले होते.या पदयात्रेत जागोजागी आमदार देशमुख यांचे महिलावर्गांकडून औक्षण करण्यात आले. ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. या भागात केंद्र आणि राज्य शासनाचे अनेक योजनांचे लाभ आम्ही वेळोवेळी नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. देशमुख मालकांच्या प्रचारार्थ मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. प्रभाग क्रमांक सहा हा सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा भाग ठरेल असे भाजपचे किरण पवार यांनी सांगितले.आमदार देशमुख हे नागरिकांच्या कायम संपर्कात राहत असतात आमच्या अनेक अडीअडचणी सोडवण्याचे काम देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे आजच्या पदयात्रेत आम्ही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालो असून भाजप अथवा देशमुख मालकांसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत असे या भागातील नागरिक पूजा कुडल आणि प्रतीक्षा शहा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *