सोलापूरराजकीय

बबनदादाच्या राजकीय वारसाला तिसऱ्यांदा अपयश

सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक जिंकणारे माजी आमदार बबनदादा शिंदे यांना आपला राजकीय वारसदार ठरविण्यात अपयश आले आहे. चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीबरोबरच यापूर्वी इतर दोन वेळा वेळा हार पत्करली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी बबनदादाचे नाव आवर्जून घेतले जायचे. जिल्हा नियोजन सभेत माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांच्यानंतर बबनदादांना बोलण्याचा मान होता. सोलापुरात आलेले मंत्री पवन दादांच्या तोंडून जिल्ह्याचे प्रश्न समजावून घ्यायचे. पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालप झाली. अपक्ष म्हणून निवडून येणे व राज्याच्या राजकारणात सोयीची भूमिका घेणे हे काही नेत्यांना आता महागात पडले आहे. यात बबनदादांचीही भूमिका अडचणीची ठरली आहे. साखर कारखान्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. यातून त्यांची लोकप्रियता ढासळत गेली. अशात त्यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून मुलगा रणजितसिंह यांना पुढे केले. पण पित्याची राजकीय पुण्याई रणजितसिंह यांच्या वाट्याला कामी आलेली दिसत नाही. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवेळी संख्याबळ असतानाही केवळ एकमताने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभेला अपयश आले. जिल्हा परिषद गट व जिल्हा दूध संघ सोडले तर जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी बबनदादाचे राजकारण चालले नाही. आता तर विधानसभेचा पराभव जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात अपक्षाचे राजकारण राहिलेले दिसत नाही. करमाळा व माढा मतदारसंघात लोकांनी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे पित्याची राजकारणातील पुण्याई कमावण्यासाठी रणजीतसिंह यांना जनाधार कमवावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button