
सोलापूर : शहर उत्तर मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या प्रचाराला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरात निवडणूक लढविणारी ही एक नारी सर्वांना भारी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोलापूर शहर उत्तर मतदार संघात विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे व अपक्ष उमेदवार शोभा बनशेट्टी अशी तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. अपक्ष उमेदवार व माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी भाजपचा राजीनामा देऊन या मतदार संघात बंड केले आहे. भाजपने नवीन उमेदवाराला संधी द्यायला हवी होती असा त्याने आरोप केला होता. नव्या नेतृत्वाला थोडा घातला जात असल्याने त्यांनी स्वतःच्या पायावर ही निवडणूक यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. आत्तापर्यंत केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे. मतदारांना प्रत्यक्ष संपर्कातून त्यांनी आपली महत्त्वकांक्षा पटवून दिले आहे. त्यांच्या घरोघरी संपर्क अभियानाला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या पदयात्रेला महिलांची मोठी गर्दी होत आहे. महापौरनंतर आमदार होण्यासाठी एका आमदार कन्येची चाललेली ही धडपड पाहून लोकांना कौतुक वाटत आहे.