सोलापूरनिवडणूकराजकीय

कॉम्प्युटरचं दक्षिण सोलापुरात जोरदार सर्चिंग सुरू

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्ती प्रचारात उतरली असून विजापूर रोड भागातील या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

उमा काडादी, तेजश्री काडादी, सुप्रिता चाकोते, माजी महापौर अलकाताई राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने माता भगिनी पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कमलानगर, सुशीलनगर, नेहरूनगर, माशाळवस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. उमा काडादी यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.धर्मराज काडादी यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि सोलापूरच्या विकासाच्या नवनवीन संकल्पना असल्याने आम्ही त्यांनाच विजयी करण्याचा संकल्प केला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. हद्दवाढ भागात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याची धमक काडादी यांच्यामध्येच असल्याने सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसेच किशोर लवंगे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button