
- सोलापूर : जुनी पेन्शन योजनेसाठी झेडपीच्या विविध कर्मचारी संघटनेनी पुकारलेला संप मागे घेण्यात आल्यामुळे शुक्रवारी कामकाज पूर्वतत होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात गुरुवारी एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत कर्मचारी संघटनेनी बेमुदत संपाची हाक दिली होती. १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना रदद करुन जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी मागील १४ ते २० मार्चपर्यंत सात दिवसांचा संप केला होता. माजी सनदी अधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली त्रिसदस्यीय जुनी पेन्शन योजनेच्या समितीची स्थापना १४ मार्च रोजी करण्यात आली होती. तरी जुनी पेन्शन लागू करण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचा
री महासंघाच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संपात सहभागी होऊन परिसरात घोषणाबाजी करीत आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाला काही संघटनांनी पाठिंबा दिला होता. आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय सह सचिव दिनेश बनसोडे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे, कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, कंत्राटी कर्मचारी संघाचे प्रदेश अध्यक्ष सचिन जाधव, अनिल बिराजदार, सी .टी .पवार, लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, सुनंदा सुरवसे, चेतन भोसले, निर्मला पवार, सचिन चव्हाण, संदीप खरबस, कानिफनाथ चव्हाण, सचिन सोनकांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुरुवारी झेडपीचे कामकाज ठप्प झाले. राज्यभरातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेत आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेचे कामकाज नियमित होईल असे सांगण्यात येत आहे.