सोलापूरजिल्हा परिषद

झेडपी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत लवकरच मुंबईत बैठक लावणार

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व विविध मागण्यांबाबत लवकरच  बैठक घेण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील ग्रामविकास विभागअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे यासाठी बैठक आयोजित करावी अशा विविध आठ मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर समक्ष भेटून चर्चा करून देण्यात आले. याबाबतीत मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन युनियनच्या शिष्टमंडळाला महाजन यांनी दिले. यामध्ये प्रामुख्याने 2005 पूर्वीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने जुनी पेन्शनसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा, सर्वात संवेदनशील असे लिपिक, लेखा,आरोग्य,वाहनचालक,परिचर, पशुसंवर्धन या विभागाची वेतन त्रुटी निराकरण पालकत्वच्या भूमिकेतून वित्त विभागाकडे मांडावी, महाराष्ट्र विकास सेवा वर्ग दोनमधील तातडीने पदे bharavit. त्यात विशेषतः पुणे विभाग मागे आहे. ती पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावीत. पशुसंवर्धन विभागाचे नव्याने झालेले पुनर्रचना स्थगित करून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निवेदन विचारात घेऊन याबाबतीत सुधारित निर्णय जाहीर करावे, दरमहा वेतन एक तारखेला होणे, वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेमधील अन्याय दूर करावा, 2005 पूर्वी अनुकंपाधारक यांचे नावे जेष्ठता यादी प्रसिद्ध झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन लागू व्हावी. अशा प्रकारचे निवेदन ग्रामविकास मंत्री महाजन यांना चर्चा करून देण्यात आले. याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चर्चेस राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस. पी .माने, जिल्हा अध्यक्ष तजमुल मुतवली, डॉ.नाना सातपुते,योगेश हब्बु,भीमाशंकर कोळी,विलास मसलकर,बसवराज दिंडोरे,राजीव गाडेकर, अभिमन्यू कांबळे, पी.सी. कविटकर, राकेश सोड्डी,रोहित घुले,संतोष शिंदे,विशाल घोगरे, श्रीशैल देशमुख,चेतन वाघमारे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button