
सोलापूर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नार्कोटिक ड्रग्स कंट्रोल ब्युरोकडून सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकीलपदी अँड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त लोकशासन आंदोलन पार्टीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यापूर्वी जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना सरकारतर्फे प्रभावी बाजू मांडून आरोपींच्या शिक्षेचे प्रमाण वाढविल्याने या कामाची दखल घेऊन सरकारने एडवोकेट न्हावकर यांची ही नियुक्ती केली आहे.ही नियुक्ती चार वर्षांसाठी असून नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985 व प्रिव्हेंशन ऑफ इलिसीट ट्राफिक इन नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबस्टन्स ऍक्ट 1988 या दोन्ही कायद्यातून उदभवणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील खटल्यांसाठी सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ही नियुक्ती झालेली आहे. या नियुक्तीबद्दल संतोष न्हावकर यांचा लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे, कार्याध्यक्ष मारुती जाधव, प्रकाश राठोड यांनी सन्मान केला.