सोलापूरराजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदीच सोडू शकतात डॉक्टरांचे प्रश्न

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक :- पालकमंत्री चंद्रकांत प

 

सोलापूर : देशाच्या आरोग्याच्यादृष्टीने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. मोदी हे नको खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात. मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण नरेंद्र मोदीच करू शकतात. वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते. सोलापुरातील डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील बैठकीदरम्यान डॉक्टरांना दिली.

श्रीनिवास संगा यांच्या पुढाकाराने शहरातील डॉक्टरांचे बैठक घेण्यात आली. या बैठकीस डॉक्टरांनी आपल्या समस्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी या बैठकीस मोहन डांगरे, डॉ. रविराज गायकवाड, डॉ. सारडा, डॉ. सचिन बोंगलीकर, डॉ. नितीन बलवान, डॉ. जिद्दीमनी, डॉ. चंदन रवा, डॉ. श्रीनिवास पिंडीपोल, डॉ. सुनील काटे, डॉ. राजेश फडकुले यांच्यासह सोलापूर शहरातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी संगा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉक्टरांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. अत्यंत खेळीमेळी वातावरणात ही बैठक पार पडली. यावेळी शहरातील डॉक्टर्स संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button