सोलापूर झेडपीत काम केलेले ‘हे” सीईओ होणार कलेक्टर
निवृत्तीनंतर उच्च पदावर जाण्याची पहिलीच संधी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना निवृत्तीनंतर कलेक्टर पदावर बसण्याची संधी मिळणार आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रकाश वायचळ हे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली झाली. त्यांची बदली होताना ते कलेक्टर पदावर जाणे अपेक्षित होते. आयएए पदोन्नतीच्या यादीत त्यांचे पहिलं नाव होतं पण त्रुटी दाखवून त्यांना आयएएस पदोन्नतीत डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांना कलेक्टर पदावर जाता आले नाही. या अन्यायाविरुद्ध त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. निकाल त्यांच्या बाजूने लागला व त्यांना पदोन्नती देण्याचे भारतीय प्रशासक सेवेला आदेश देण्यात आले. पण तोवर ते निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला व निवृत्तीचा काळ धरून त्यांना कलेक्टर पदावर संधी देण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांना आता या पदावर संधी मिळणार आहे.