सोलापूरक्राईम

लोकांनो घाबरू नका…कुरुल- पंढरपूर रस्त्यावर ‘ती” घटना घडलीच नाही

पोलिसात लुटीची फिर्याद देणाराच निघाला चोर

सोलापूर : तिर्हे, कामती, कुरुलमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये गेल्या आठवड्यात घबराट पसरली होती. कुरुलजवळ एका मोटरसायकलस्वाराला लुटल्याची पोलिसात तक्रार नोंद झाली होती. पण या प्रकरणाचा पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यावर तक्रार देणाराच चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी संगनमताने चोरीचा बनाव करणाऱ्या दोघांवर कामती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामतीतील तेरणा मेडिकलच्या औषध विक्री करणाऱ्या वाहनावरील चालक सैफन सिकंदर सय्यद याने दि. २३ डिसेंबर रोजी रात्री औषधे विक्री करून येत असताना कुरुलच्या एम.एस.ई.बी. केंद्राजवळ रिक्षातून आलेल्या तिघांनी सैफन सय्यद यांच्या वाहनाच्या काचेवर दगड मारून तसेच डोळ्यात मिरचीची पूड टाकून औषधी विक्री करून आलेले एक लाख पाच हजार रुपये व त्यांच्या खिशातील वन प्लस मोबाईल असा एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद कामती पोलिसात दिली होती घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाचीगती वाढवली.तेव्हा संशयास्पद काही आढळले नाही.तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे उलटी फिरवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांच्यामध्ये विसंगती दिसून आली.यापूर्वीही वाहनाच्या अपहारात सैफनवर गुन्हा दाखल झाला होता.अधिक चौकशी केली असता सैफन याने मेव्हणा सुलतान उमरसो मुल्ला,(वय २५, रा. मुल्ला वस्ती देगाव, ता. उत्तर सोलापूर) याच्या मदतीने संगनमत करून चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले. सैफन याला कर्ज झाल्याने असा बनाव केल्याचे पुढे आले.याप्रकरणी आरोपीकडून गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व ४६ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button