सोलापूरराजकीय

मी भाजपचा आमदार होणार हे “तात्यां’चेच भाकीत

सोलापूर : मी सन 2024 मध्ये भाजपचा आमदार होणार हे तात्यांनीच (आजोबा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. विष्णुपंत कोठे ) 2015 मध्ये मला सांगितले होते, अशी प्रतिक्रिया सोलापूर शहर मध्ये चे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मेकॅनिकी चौकातील कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. अत्यंत विनम्रपणे त्यांनी नागरिकांचा हा सन्मान स्वतः भेट घेऊन स्वीकारत आहेत. आपल्या विजयाबाबत “सोलापूर समाचार’ शी प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, माझ्या विजयाने तात्यांची स्वप्नपूर्ती झाली हे खरे आहे. मी भाजपमध्ये आलो हा चमत्कार नव्हता. तात्यांनीच मला 2015 मध्ये सांगितले होते की तुला सन 2024 मध्ये भाजपचा आमदार व्हायचे आहे. तात्या पट्टीचे राजकारणी होते. त्यांना त्याचवेळी अंदाज आला होता. तात्यांनी दहा वर्षांपूर्वी केलेले भाकित आज खरे ठरले आहे. तात्यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून सेवा केली. महापालिकेचे नेतृत्व वगळता आमच्या घराण्याला न्याय मिळाला नाही. काँग्रेसमध्ये अनेक जणांना मागच्या दाराने प्रतिष्ठा मिळाली पण तात्या उपेक्षित राहिले. तात्यांची ही सल आम्हाला जाणवत राहिली. सुरुवातीपासूनच माझ्या रक्तात हिंदुत्व आहे. मी महापालिका निवडणूक लढतानाच भगवा झेंडा हाती धरला. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मी भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ही भेटच माझा टर्निंग पॉईंट ठरली. भाजपमध्ये जायचे हे माझे सुरुवातीपासूनच ठरलेले होते. संधी मिळताच मी माझा निर्णय घेतला. भाजपने मला न्याय दिला. अवघ्या तीन महिन्यात शहर मध्य विधानसभेचे तिकीट दिले. मला निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्व यंत्रणांनी कष्ट घेतले. हा विजय सर्व नागरिकांचा आहे. हिंदुत्व व जिहादी प्रवृत्तीविरुद्ध मी बोलतोय. निवडणुकीत माझ्या भाषणाचाही विपर्यास्त केला गेला. एमआयएमसारख्या जातीयवादी शक्तीविरुद्ध मी बोलणारच. त्यामुळे जनतेने मला साथ दिली आहे, असे ते म्हणाले.

स्व. विष्णुपंत कोठे यांना काँग्रेसने यांना न्याय न दिल्यामुळे आमदार देवेंद्र यांचे चुलते महेश कोठे हेही काँग्रेसमधून बाहेर पडले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून चार वेळा विधानसभा लढवली पण त्यात त्यांना यश आले नाही. पुतण्याने मात्र पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. त्यांच्या या यशाचे राज्यभर कौतुक होत आहे.

पोलीस आयुक्तांचा सन्मान 

आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार कोठे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले.यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, निवडणुककाळात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वच विशेषत: संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीच्या निकालानंतरही शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केल्याचेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले, आमदार देवेंद्र कोठे यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक आहे. शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असेल असा विश्वास आहे. नगरसेवक पदापासून आजवरची कामगिरी पाहता आमदार देवेंद्र कोठे यांचे भविष्य उज्वल आहे, असे कौतुकास्पद उदगारही पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button