
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या चुरशीच्या मतदानानंतर आता कोण निवडून येणार यावर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. मीडियाने राज्यातील पोल मतदानानंतर लगेच जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोण निवडून येणार याविषयी बरेच अंदाज पुढे आले आहेत. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी केलेला अंदाज “सोलापूर समाचार’ प्रसिद्ध करत आहे.
मतदानानंतर प्रत्येक विधानसभानिहाय लोकांचा कौल लक्षात घेऊन सोलापुरातील जेष्ठ पत्रकारांनी कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येऊ शकतील याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या नेत्यांचा प्रभाव पडला, स्थानिक प्रश्न काय होते? कोणाच्या बाजूने लोकांनी कौल दिला, सत्ताधारी व विरोधकांच्या प्रचाराचा काय प्रभाव पडला याविषयी मते जाणून अंदाज व्यक्त केले आहेत. सर्वच मतदारसंघात लाडक्या बहिणींचा प्रभाव दिसून आला. लाडक्या बहिणींचा महायुतीला फायदा दिसत आहे. पण तरीही स्थानिक व इतर प्रश्नांवर अनेकांनी मैदान गाजवले आहे. अपक्षांचीही प्रचार यंत्रणा मोठी होती पण बुथ यंत्रणेवर त्यांची पकड ढिली दिसून आली. माढा व करमाळा मतदार संघात मातब्बर अपक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे येथे चुरशीचे मतदान झाले आहे. “सोलापूर समाचार’ च्या निरीक्षणा नुसार भाजपची माळशिरस ची जागा जाईल पण इकडे सोलापूर शहर मध्य प्लस होईल. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा या जागा आबाधीत राहणार आहेत. या विधानसभेला काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार होईल. माढा बदल होऊ शकतो पण सांगोला व करमाळ्याच्या जागेवर विद्यमान आमदारांना यश मिळेलअसे वाटते. मतदारसंघांमधील सर्व बाबींचा वेध घेऊन पत्रकारांनी पुढील प्रमाणे अंदाज व्यक्त केला आहे.
पहिला अंदाज…
१) करमाळा-नारायण पाटील
२) माढा-अभिजित पाटील
३) बार्शी-दिलीप सोपल
४) मोहोळ राखीव-राजू खरे
५) पंढरपूर-भगीरथ भालके
६) सांगोला-डॉ. बाबासाहेब देशमुख
७) सोलापूर शहर उत्तर-विजय देशमुख
८) सोलापूर शहर मध्य-देवेंद्र कोठे
९) सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख
१०) अक्कलकोट-सचिन कल्याणशेट्टी
११) माळशिरस राखीव-उत्तम जानकर
यापैकी एक-दोन जागांमध्ये फरक होऊ शकतो.
दुसरा अंदाज…
माळशिरस – उत्तम जानकर
माढा – अभिजीत पाटील
करमाळा – नारायण पाटील
दक्षिण सोलापूर – सुभाष देशमुख
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
सोलापूर उत्तर – महेश कोठे
पंढरपूर – मंगळवेढा – समाधान आवताडे
सांगोला – दीपकआबा साळुंखे
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
मोहोळ – यशवंत माने
तिसरा अंदाज…
बार्शी – दिलीप सोपल
माळशिरस – उत्तम जानकर
माढा – अभिजीत पाटील
करमाळा – नारायण पाटील
दक्षिण सोलापूर – सुभाष देशमुख
सोलापूर शहर मध्य – फारुक शाब्दी
सोलापूर उत्तर – महेश कोठे
पंढरपूर – मंगळवेढा – समाधान आवताडे
सांगोला – बाबासाहेब देशमुख
अक्कलकोट – सिद्धाराम म्हेत्रे
मोहोळ – राजू खरे