सोलापूरक्राईमजिल्हा परिषद

माळशिरस पंचायत समितीतील अभियंता चौगुले 50 हजाराची लाच घेताना अटकेत

सोलापूर : ग्रामपंचायतहद्दीत केलेल्या इलेक्ट्रिक कामाचे बिल मंजूर करण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात एक लाखाची लाच मागून 50 हजार रुपये घेताना माळशिरस पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले आहे. शशिकांत सयाजी चौगुले (कनिष्ठ अभियंता, तालुका पंचायत समिती, माळशिरस ) असे त्या अभियंत्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे शासकिय इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठीचा शासकीय परवाना असून, त्यासाठी त्यांनी एक फर्म स्थापन केली आहे. या फर्मद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणारी सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामे करण्यात येत असतात. या फर्मला मिळणारी शासकीय इलेक्ट्रिक कामे करण्यासाठी तसेच केलेल्या कामाच्या बिलासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने तक्रारदाराला अधिकारपत्र दिलेले आहे. तक्रारदाराने फर्मच्यावतीने फळवणी ग्रामपंचायत येथे शासकिय इलेक्ट्रीक काम पूर्ण केलेले आहे. त्याबाबतचे बिल त्यांना मिळाले आहे. तसेच त्यांनी पिलीव ग्रामपंचायतअंतर्गत केलेल्या रोडलाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असताना तक्रारदार हे पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता  शशिकांत चौगुले यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदाराकडे फळपणी ग्रामपंचायतअंतर्गत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३४ हजार रुपये व पिलीव ग्रामपंचायत हदीत केलेल्या कामाच्या बिलासाठी करत असलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३३ हजार रुपये असे एकूण ६७ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली आहे. प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांनी केलेल्या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिकल कामाचे बील मंजुरीसाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तरोच तक्रारदाराने इतरत्र केलेल्या कामाचे बील भविष्यात मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांच्याकडून एकुण लाच मागणी रकमेपैकी ५० हजार रुपये पंचायत समिती कार्यालयात स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले याच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ घे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button