सोलापूरचे डेप्युटी सीईओ इशाधीन शेळकंदे यांची बदली
दर्यापूर पंचायत समितीचे बीडीओम्हणून नियुक्ती

सोलापूर : राज्यातील बीडीओंच्या बदल्यामध्ये सोलापूर झेडपीला आणखी एक धक्का बसला आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांची अमरावतीला बदली झाली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील करमाळा दक्षिण सोलापूर मोहोळ व्हिडिओच्या बदल्या झाल्या. करमाळ्याला कदम हे बदलून आले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बदली समोर आली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांची अमरावतीला बदली झाली आहे. त्यांनी यापूर्वी पंढरपूरचे बीडीओ म्हणून काम केले आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर त्यांनी पाणी व स्वच्छता विभागाचा ही कारभार पाहिला आहे. सरपंच परिषदेने नुकताच त्यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव केला आहे. जिल्हा परिषदेतील ऍक्टिव्ह अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. ग्रामसेवक पदोन्नती, पुरस्कार असे अनेक प्रश्न त्यांनी सोपस्कारपणे हाताळले. त्यांच्याही बदलीने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अमरावतीतील दर्यापूर पंचायत समितीचे बीडीओ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.