सोलापूरक्राईमजिल्हा परिषद
एम राजकुमार सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त
राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमीला बदली

सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे तर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमीला बदली झाली आहे.
राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमीला बदली झाली असून त्यांच्या जागी जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार पदोन्नतीने बदलून येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. वाचा अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्ती.