बँक ऑफ इंडियाने थकीत कर्जदारांना दिली सुवर्णसंधी

सोलापूर : बँक ऑफ इंडियाने जिल्ह्यातील सर्व शाखांमधील थकीत कर्जदारांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. सोमवार दिनांक 20 जानेवारी ते बुधवार दिनांक 22 जानेवारी या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये बँक ऑफ इंडिया च्या सर्व शाखांमध्ये समजवता नवीन वर्ष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर मंत्री यांनी दिली आहे.
बँक ऑफ इंडिया च्या वतीने ही देशभक्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया च्या सर्व शाखांमध्ये वन टाइम सेटलमेंट अंतर्गत कर्जदारांच्या एनपीए कर्ज खात्यांची पूर्तता करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या कर्जदारांना व्यवसाय करताना आलेले आजारपण नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही खऱ्या कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. बँकेकडे लघु, मध्यम, दीर्घ मुदत आकाराची खाते सेटल करण्यासाठी विशेष वन टाइम सेटलमेंट योजना उपलब्ध करण्यात आली आहे. ज्याद्वारे ज्या कर्जदारांची खाती एनपी आहेत त्यांना विशेष आणि चांगल्या सवलती दिल्या जातात. ज्यांचे खाते एनपीए झाले आहे, त्यांनी सोमवार दिनांक 20 ते बुधवार दिनांक 22 जानेवारी या कालावधीत बँक शाखेत जाऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.