कलेक्टरांच्या आश्वासनानंतर सोलापुरातील रेशन दुकाने सुरू

सोलापूर : पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी करिता या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनी हे आंदोलन सुरू झाल्यावर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या आंदोलनाची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चौकशी अहवालावरून पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर रेशन दुकाने पुन्हा दुपारपासून पूर्वतत सुरू करण्यात आली.
पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षका विरुद्ध आलेल्या तक्रारीवरून प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. पण चौकशी समितीचा अहवाल न आल्याने संबंधित पुरवठा निरीक्षका विरुद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा संघटनेने पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी,अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदनाद्वारे 15 ऑगस्ट पासून संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार संघटनेने स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन सुरू केले होते. स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजरोहाणानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्षांच्या शिष्टमंडाळासोबत बैठक घेऊन तक्रार जाणून घेतली. पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्याविरुद्धच्या तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.अहवालानंतर ते दोषी आढळल्यास विभागीय चौकशी व निलंबनाची कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकारीना महाराष्ट्रभर चाललेल्या सर्वर डाऊनमुळे अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहेत. त्यांना पुन्हा वेठीस धरू नका अश्या सूचना देत संप माघार घ्यावा अशी सूचना केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश मान्य करत सोलापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. संघटनेने संप मिटल्याचे आवाहन करताच गुरुवारी दुपारनंतर धान्य वाटपास सुरुवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे व अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे साहेब यांच्या मध्यस्थीने संप मिटल्याचे घोषित करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, पंचकमिटी शिवकुमार चकोले, बापूसाहेब गंदगे,शिवशंकर कोरे,जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख,उमेश आसादे,जिल्हा सचिव राज कमटम, राजशेखर जवळे,बसवराज बिराजदार, वसीम शेख,पंढरपूर तालुकाध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप पावले, जिल्हा संघटक समाधान रोंगे यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते.