
सोलापूर : तुमच्यातले कोण विधानसभेला इच्छुक आहे का? असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी केल्यामुळे दक्षिण सोलापुरातील कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले.
सध्या सर्वत्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात हवसे, गवसे आणि नवसे यांचा बोलबाला सुरू आहे. भावी आमदार म्हणून अनेक ठिकाणी डिजिटल फलक झळकत आहेत. ज्यांना कोणी मतदारसंघातील ओळखतही नाही, असे अनेक जण या शर्यतीत धावपळ करू लागले आहेत. त्यात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची रांगच लागली आहे. सर्वच पक्षाकडून अनेक जण इच्छुक म्हणून पुढे येऊ लागले आहेत. या इच्छुकांमुळे नेतेही आवक होऊ लागले आहेत. दक्षिण सोलापूर तसा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचा मतदारसंघ. आता त्यांच्या सभोवती बसणारेही विधानसभेला इच्छुक असल्याचे सांगू लागले आहेत. भाजपमध्येही इच्छुकांची मोठी यादी तयार होऊ लागली आहे. यामुळे खुद्द आमदार सुभाष बापू यांना धक्का न बसल्यास नवल काय? दक्षिण सोलापुरातील एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता अनेक कार्यकर्ते त्यांच्यासमोर आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मिश्किलपणे प्रश्न केला “यातील कोणी इच्छुक आहे का?’ बापूंच्या या प्रश्नामुळे कार्यकर्तेही बुचकाळात पडले. कार्यकर्त्यांमधून उत्तर न आल्याने बापूही प्रश्नार्थक मुद्रेने कार्यक्रमाकडे वळले पण बापूंच्या या प्रश्नांमुळे चर्चा तर होणारच. कार्यकर्ते एकमेकाला विचारू लागले “बापू असे का बोलले?…