सोलापूरनिवडणूकराजकीय

विरोधकांच्या घरासमोरीलही रस्ते विजयकुमार देशमुख यांनी केले

सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदार संघाचे विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ६ मधील राजेश कोठे नगर, लक्ष्मी पेठ येथून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. महिलांच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी दीड हजार रुपये दिल्याचे फलक घेण्यात आले होते.

ही पदयात्रा राजेश कोठे नगर, धुम्मा वस्ती, शेटे वस्ती, वाय चौक येथे या पदयात्रेचा समारोप होणार आहे.
विरोधकांच्या घरासमोरील रस्ते देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहेत त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्यावर आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नसल्याचा आरोप रेखा गायकवाड यांनी पदयात्रेवेळी केला.

यावेळी माजी नगरसेवक सुनील खटके, प्रभाग अध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, रवी नंदास, शशिकला कसपटे,अंकुश पसारे, माजी नगरसेवक सुनील खटके, राष्ट्रवादीचे श्याम गांगर्डे, जगन्नाथ चव्हाण, रवी नामदास, मेघराज पसारे, अमर दुधाळ, मनोज पवार, रंजीत कोकाटे, अशोक गलांडे, रेखाताई गायकवाड, निकिता बघेल, अशोक गलांडे, सुदर्शन चव्हाण, नाडगिरी, अभय बनसोडे, सुमित वाघचौरे, स्मिता नामदास, जयमला राजपूत सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button