सोलापूरनिवडणूकराजकीयसण- उत्सव

भाजपने संधी न दिल्यास “हा’ नेता दक्षिणमधून अपक्ष लढणार

श्री गणेश पूजनाने जुळे सोलापूर सामाजिक कार्याची पेरणी

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी भाजपने संधी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वयंम एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सोमनाथ वैद्य यांनी केली आहे.

जुळे सोलापुरातील श्री सिद्धेश्वर पार्कला सोमनाथ वैद्य यांनी सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. श्री सिद्धेश्वर पार्क चा परिसर व शिव मंदिराचे पाहणी करून त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर श्री गणेशाची महापूजा ऍड सोमनाथ वैद्य यांच्याहस्ते झाली. यावेळी सिद्धेश्वर पार्कतर्फे प्रा. नवनाथ व्हटकर, गुरन्ना हावशेट्टी, आनंद जाधव,बसवराज हळळी, सिद्ध स्वामी, विश्वेश्वर स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना सोमनाथ वैद्य म्हणाले की मी मंत्रालयात काम केले आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची जाण व त्याची सोडवणूक कशी करायची याची मला माहिती आहे. दक्षिण सोलापुरातून भाजपकडून मी इच्छुक आहे. भाजपच्या 10 माजी नगरसेवकांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. दांडग्या जनसंपर्क व समाजकार्यातून माझे काम लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यशस्वी होणार याचा मला विश्वास आहे. सिद्धेश्वर पार्कमधील शिव कृपेने मला उमेदवारी मिळावी, असे साकडे त्यांनी यावेळी घातले. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button