सोलापूरकृषीजिल्हाधिकारी कार्यालय

उजनीचे पाणी नदीत वाढविले; जिल्हा कोरडा असताना कालव्याचे नियोजन नाहीच

सोलापूर : पाटबंधारे विभागाने सोमवारी दुपारी तीन वाजता उजनीतून भीमा नदीत पुन्हा दहा हजार कुसेक्स पाणी वाढवले असून जिल्हा कोरडा असताना कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन शून्य दिसून येत आहे.

राज्यात सगळीकडे संततधार पाऊस आहे. पण सोलापूर जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून पावसाचा थेंब नाही. जोरदार वारा वाहत असल्याने जमिनीतील ओलावा हटला आहे. अनेक तालुक्यात विहिरी, बोअरला पाणी येईल इतपत पाऊस झालेला नाही. उजनी शंभर टक्के भरल्याने  भीमा नदीत एक लाख दहा हजार कुसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. भीमेला पूर येण्याची स्थिती असताना कालवे मात्र कोरडेठाक आहेत. वाया जाणारे पाणी कालव्यात सोडून उन्हाळ्यातील सिंचन वाढविता येणे शक्य असतानाही याकडे दुर्लक्ष झाले आहे. कालव्यात पाणी सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी असतानाही पाटबंधारे विभागाने अजून नियोजन केल्याचे दिसून येत नाही.

पाटबंधारे विभागाने उजनीतील पाण्याविषयी दिलेली ही अपडेट माहिती…. त्यात मुख्य कालव्यात पाणी सोडल्याचे दिसून येत नाही.

*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 05/08/2024 at 15:00 Hrs
RWL —— 496.900 m
Water Spread Area = 337.94 Sq.km.
*-Storage-*
Gross — 3343.62 MCum.
— ( 118.07 TMC)
Live — 1540.81 MCum.
— (54.41 TMC)
Live % —– *101.56 %*

*Inflow River Gauging Station @ Daund :-*
River Water Level – 505.100 m
Inflow Discharge – 208449 Cusecs.

*Outflows :-*
1) Sina Madha LIS – 105 cusecs.
2) Dahigaon LIS – 100 Cusecs.
3) Tunnel – 900 cusecs.
4) Main Canal -00 Cusecs.
5) Power – 1600 Cusecs.
6) Spillway – 110000 Cusecs.
*Bhima River Total Discharge – 111600 Cusecs.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button