सोलापूरजिल्हा परिषद

काय म्हणता..! झेडपीच्या ‘या” कामांवर वारकरी झाले खुश

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही केले सीईओ मनीषा आव्हाळे यांचे कौतुक

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त संताच्या पालख्यांचा सोलापूर जिल्हात प्रवेश झाला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत दाढी कटींग, मसाज, इस्त्रीची सुविधाबरोबर शौचालय व स्नानगृह सुविधा व स्वच्छतेमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळाबरोबर इतर आठ पालखी सोहळ्या चा ताण जिल्हा परिषद प्रशासनावर आहे. पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी भाड्याने स्नानगृह घेण्याऐवजी ग्रामपंचायतींनी स्नानगृह बनविल्यामुळे स्नानगृहाची संख्या वाढली आहे. पालखी सोहळयात मुक्कामी महिलांना स्नानाबाबत खूप अडचणी येत होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. पालखी मार्गावर एक हजार स्वतंत्र स्नानगृहे उपलब्ध करून दिलेली आहेत. अशाच अनेक नाविन्यपूर्ण सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर उत्कृष्ट नियोजन केलेमुळे वारकरी खुश झाले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही स्वच्छताग्रह, हिरकणी कक्ष व स्नानग्रहाच्या सुविधेंचं कौतुक केलं आहे.

जिल्हा परिषद प्रशानाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या अन्य सुविधा पुढीलप्रमाणे…
*स्वच्छता* युध्दपातळीवर स्नानगृहे उभारणे, पालखी तळाचे मजबुतीकरण, शौचालय व इतर सुविधांसाठी नकाशे, स्वच्छतादूत, आरोग्यदूत, मोबाईल आरोग्य पथकामुळे जागेवर उपचाराची सोय, पालखी तळाची स्वच्छता,झाडेझुडपे काढणे, मुरुमीकरण करणे, गावामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या ठिकाणी स्वच्छता करून देणे, गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी आदी कामे करणेत आली आहेत. जिल्हा परिषदेने इतर ग्रामपंचायतीकडून कर्मचारी व घंटागाड्या तैनात केले आहेत.
*मोबाईल टॉयलेट*-
पालखी मार्गावर 3925 मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. 300 स्वयंसेवक काम रत आहेत. शौचालयाची वेळोवेळी साफसफाई जेट्टिंग मशीन च्य सहायने केलेमुळे घाण झाली तरी वेळेत सफाईमुळे शौचालयाचा प्रत्येक ठिकाणी वापर होत आहे. 15 शौचालाया मागे एक सफाई कर्मचारी व 25 टॉयलेट मागे एक सुपरवायझर नेमण्यात आला आहे. . शौचालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर साठी पालखी मार्गावर स्वतंत्र फीडिंग पॉइट करून देणेत आला आहे. त्यामुळे टँकर वेळेवर भरून शौचालयाचे ठिकाणी येत आहेत.
*सुविधा मुळे वारकरी खुश…!*
मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी महिला वारकऱ्यांना विशेष सुविधा देण्यावर भर देण्यात आलेला होता. यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात आली आहेत. त्याचा वापर संग्रामनगर व यशवंतनगर व माळीनगर व बोरगाव ग्रामपंचायती मध्ये झालेला आहे. पालखीतळाच्या बाजूला महिला साठी स्नानगृह व महिलांसाठी शॉवरच्या माध्यमातून अंघोळीची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर स्वतंत्र चेंजिंग रूमही तयार करण्यात आले होते. याचा लाभ हजारो महिला वारकऱ्यांनी घेतला आहे. भंडीशेगाव व पिराची कुरोली व वाखरी येथे देखील सुविधा सज्ज आहेत. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा बद्दल आभार व्यक्त केले आहे.
*सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन*
महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते या माध्यमातून महिलांना मोफत सॅनिटरी पॅड नगरपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.
*हिरकणी कक्ष*
लहान मुलांसाठी व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता .त्या ठिकाणी पाळणाघर, दूध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती अंगणवाडी सेविका च्या माध्यमातून वारकऱ्यांना देण्यात येत होती. अशा सेविकांनी *मुख्यमंत्री लाडकी बहीण* योजनेची माहिती वारकऱ्यांना करून दिली
यावेळी जिल्हा परिषत प्रशासन प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिा आव्हाळे यांनी पालखी सोहळा प्रमुख यांचे संवाद साधून वेळापूर , भंडीशेगाव येथील सुविधा बाबत तोडगा काढला आहे.
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भाविकांसाठी विशेषता महिला भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाबाबत रूपाली चाकणकर यांनी कौतुक केले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अमोल जाधव यांचे सह सर्व गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख व कर्मचारी सुविधा देणे साठी युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत.

मोबाईल चार्जिंग कक्ष व मसाज केंद्र..
वारकऱ्यांचे चालून थकत असलेने पाय दाबणेचे मशीन बसविणेत आले आहे. वारकरी या सेवेमुळे तृप्त झाले आहेत. वारकरी निवारा केंद्रात मोबाईल चार्जिंग साठी अनेक पॉईंट काढून देण्यात आले होते याचा लाभ वारकऱ्यांनी घेऊन समाधान व्यक्त केले आहे.

*सुविधांची थोडक्यात महिती*

* प्लास्टिक संकलन केंद्र – 352
* शौचालय संख्या – 2300
* ⁠स्नानगृहे – 1000
* ⁠पाण्याचे टॅकर – 299
* ⁠टॅंकर फिडींग केंद्र – 791
* ⁠मेडिकल किट – 4500
* ⁠आयसीयू बेड – 163
* ⁠वाॅटरप्रुफ मंडप – 34
* ⁠सॅनिटरी नॅपकीन – 50 हजार
* ⁠मदत केंद्र – 77
* ⁠हिरकणा कक्ष – 91
* ⁠आपत्कालीन केंद्र – 77
* ⁠कपडे बलणेची रूम – 82
* ⁠स्वच्छ असलेले विहीर संख्या – 318
* स्वच्छ असलेले विधन विहीर संख्या ⁠- 377
* ⁠फिरते आरोग्य पथक – 121
* ⁠दर्शन रांग आरोग्य पथक – 37
* ⁠विद्युत रोषणाई-वेळापूर , भंडीशेगाव, पिराची कुरोली पालखी तळावर 300 आकाश कंदील व विद्युत रोषणाई
जेसीपीमधून पुष्पृष्टी -10 जेसीबी – एक हजार किलो फुले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button