June 17, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

लोकशासन आंदोलन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा

सोलापूर : लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू गुरुपादप्पा दिंडोरे व कार्याध्यक्ष मारुती जाधव या दोघांविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला 11 जुलै रोजी दुपारी पावणे बारा वाजता सिविल चौकातील टायपिंग दुकानात आली होती. यावेळी तेथे आरोपी मारुती जाधव व राजू गुरुपादप्पा दिंडोरे आले.  त्या महिलेने चौकशी केल्यावर मारुती याने जातीवाचक शिवीगाळ केली तर दिंडोरे याने लज्जास्पद वर्तन केले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त तोरडमल हे करीत आहेत.

या दोघांविरुद्ध यापूर्वी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  या प्रकरणात अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर आता दुसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.