क्रीडाजिल्हा परिषदमहाराष्ट्रसोलापूर

अरे वा… इकडे सरपंच तिकडे उपसरपंच, व्हेरी गुड

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चक्क सरपंच आणि उपसरपंच यांनीही सहभाग नोंदवला आहे. संघांची ओळख करून घेत असताना सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनाला ही बाब आल्यावर त्यांनी ‘अरे इकडे सरपंच तिकडे उपसरपंच, व्हेरी गुड” असा अभिप्राय दिला.

जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट अशा स्पर्धांमध्ये चांगलाच रंग भरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी रविवारी दुपारी सामन्यांना भेट देऊन खेळाडूंची संवाद साधला. टीममध्ये सरपंच व विरोधी टीम मध्ये उपसरपंचाचा सहभाग पाहून सीईओ आव्हाळे यांना आनंद झाला. व्हेरी गुड म्हणून त्यांनी दोन्ही संघाचे कौतुक केले. सरपंचासाठीही सामने घ्यावेत असे मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेने स्पर्धांसाठी चांगली व्यवस्था केल्याबद्दल सरपंचांनी समाधान व्यक्त केले. आजच्या सामन्यात विजयी झालेल्या टीमने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. खेळाडूंच्या निवास व इतर व्यवस्था प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः सीईओ आव्हाळे मैदानात तळ ठोकून असल्यामुळे सामन्यांमध्ये आणखीनच चुरस दिसून आली.

माढा क्रिकेट टिम मधून बावीचे सरपंच मुन्ना मोरे तर माळशिरस क्रिकेट टिममधून वेळापूरचे उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर यांनी सहभाग नोंनोंदविला आहे. सांगोला व पंढरपूर महिला टिमनी विजयी झाल्याबद्भल डान्स केला. महिला थ्रो बॉल मोहोळ विरूद्ध दक्षिण सोलापूर यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. महिला थ्रो बॉलमध्ये मोहोळ टीम विजयी झाली.  हॉलीबॉलमध्ये पंढरपूर टीम विजयी झाली. क्रिकेट फायनलमध्ये
माळशिरस संघ विजयी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button