सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

अखेर झेडपीकडून “त्या’ शिक्षकांना मिळाली नियुक्ती

सोलापूर : शासनाने प्राथमिक शिक्षकांची पवित्र पोर्टलमधून भरती केली आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला २४ शिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या ४ जुलैला कागदपत्रांची तपासणी व ऑगस्ट ५ रोजी समुपदेशन झाले होते. पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला २६० शिक्षक मिळाले आहेत. त्या शिक्षकांच्या निवड व नियुक्ती होऊन जवळपास दोन महिने होत आहेत.परंतु रुपांतरीत जागेत आलेल्या नवीन शिक्षकांना सुद्धा अखेर नियुक्ती मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास ५५० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. पवित्र पोर्टलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून एकूण २९७ शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांना गुरुजी मिळणार आहेत. त्यामुळे त्या शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.पहिला टप्पा पूर्ण तर दुसऱ्या फेरीत  जवळपास २७ नवीन गुरुजी मिळाले आहेत.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यातील जवळपास २६० शिक्षकांना पवित्र पोर्टलवरून राज्यात नियुक्ती मिळाली. 5 ऑगस्ट रोजी समुपदेशनसुद्धा पार पाडले. परंतु या शिक्षकांना नियुक्ती मिळण्यास उशिर होत होता. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शेवटी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.आता रूपांतरित जागेत आलेले २४ व कन्नड माध्यमाचे तीन असे एकूण २७ गुरुजींची निवड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केलेली आहे. यात पदवीधर शिक्षक-१९,उपशिक्षक-३,कन्नड माध्यम शिक्षक -३,गैरहजर-१ असे एकूण २७ शिक्षक आहेत.

पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला २४ शिक्षक मिळाले आहेत. यामध्ये १९ शिक्षक पदवीधर, तर पाच उपशिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी समुपदेशन होऊन शाळा देण्यात आली आणि अखेर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून रूपांतरित २४ गुरुजीना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या शाळांना सुद्धा रूपांतरित जागेतून आलेले तीन कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना सुद्धा नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.

२६ शिक्षकांची टिईटी प्रमाणपत्रांची तपासणी

राज्यात बोगस टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक परिक्षा उत्तीर्ण झाले होते.त्या सर्व शिक्षकावर योग्य ती कारवाई चालू आहे. परंतू राज्यातील टीईटीची प्रमाणपत्राचे सखोल चौकशी करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदेला दिले होते. त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानेे  रूपांतरित जागेत आलेल्या सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची डिजिटल स्कॅनरद्वारे तपासणी करून सर्व पात्रता धारांकाना अखेर नियुक्ती पत्र देण्यात आले.

पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या आणि समुपदेशन होऊन त्यांना शाळा सुद्धा देण्यात आली होती. परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची नियुक्ती रखडली होती. परंतु त्यांनी वैधता प्रमाणपत्र सोलापूर जिल्हा परिषदेला सादर केला आहे. परंतु अद्याप त्यांना नियुक्ती मिळाली नाही. त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी अशी प्रशांत शिरगुर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button