
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला नगर अभियंता होण्याचा मान सारिका अकुलवार यांना मिळाला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या पहिला पहिल्या महिला आयुक्त शितल तेली यांनी मंगळवारी मनपाच्या नगर अभियंतापदी बांधकाम खात्याकडील सारिका अकुलवार यांची नियुक्ती केली तर बांधकाम खाते निळकंठ मठपती यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या 25 वर्षापासून रोजंदरीवर असलेल्या 13 कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत कायम करण्यात आले आहे. आयुक्त शितल तेली यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. अकुलवार या सोलापूरच्या असून महानगरपालिकेच्या पहिल्या महिला नगर अभियंता होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी बांधकाम, मंड्या व उद्यान, भूमी व मालमत्ता, अतिक्रमण, झोनविभागाकडे काम केले आहे. कामाचा दांडगा अनुभव व त्या डॅशिंग असल्यामुळे शहर विकासाच्या कामाचे आराखडे तयार करून मार्गी लावण्याच्या कामात त्यांची आता मोठी मदत होणार आहे. नगर अभियंतापदी नियुक्तीबद्दल अकुलवार यांचे अभिनंदन होत आहे.