सोलापूरजिल्हा परिषद

आता ग्रामपंचायतीत नेमणार जलमित्र

सोलापूर :जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहु-कौशल्यावर आधारित जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी (प्लंबर ), मेकॅनिक फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव यांनी दिली.

याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव म्हणाले , जिल्ह्यात शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रति ग्रामपंचायत याप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.मल्टी स्किलीग आर.पी.एल.मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच पुढीलप्रमाणे आहेत. १.प्लंबर (गवंडी) ,२.मोटर मेकनिक फिटर, व ३.इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी ग्रामपंचायतीमधील पुर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.तसेच ग्रामसेवक यांनी प्रत्येक ट्रेड साठी ३ उमेदवार सहभागी करून एकूण ९ नल जल मित्र (skill वर्कर) त्याची गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून त्याचे आयडेंटी साईज फोटो व आधार कार्ड पंचायत समिती येथे सादर करावयाची आहे. त्यानंतर त्यांची प्रि- स्क्रिनिंग टेस्ट करण्यात येणार आहे. यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवार निवड करण्यात येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहनही उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) जाधव यांनी केले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रती माणसी प्रती दिन ५५ लीटर विहित गुणवत्तेसह व दैनंदिन स्वरुपात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.सदर योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे.यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेले आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पूर्व नियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रीय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही.गाव पातळीवरील उपलब्ध असलेल्या अप्रशिक्षित अर्धकुशल मनुष्यबळास कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button