
सोलापूर: भाजपने दहा वर्षात सर्वसामान्य जनतेला जो त्रास दिला आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे. यासाठी मतदारांनी बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय, शेतीमालाला मिळाला न मिळालेला हमीभाव या सर्वांचा वचपा काढण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
प्रणिती शिंदे या गेल्या तीन दिवसापासून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर आहेत. रविवारी तडवळ केगाव म्हैसळगी, खानापूर या गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महागाई,दरवाढ शेतकऱ्यांचा पीकविमा,पाणी प्रश्न यांसारख्या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणावर टिकेची झोड उठवली. तालुक्याच्या प्रश्नांची मला जाण आहे व मी सोडवण्याचा प्रयन्त करेन असं आश्वासन दिलं.
यावेळी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, शीतल म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष आनंद बुक्काणुरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, बाबुराव पाटील, पिंटू पाटील, सिद्धार्थ गायकवाड, मनोज यलगुलवार, रामचंद्र अरवत, शिवयोगी लाळसंगी, शिवानंद माळी, प्रकाश पाटील, महांतेश हत्तरे, प्रकाश हिप्परगी, काशिनाथ कुंभार, रमेश चव्हाण, रोहित फुलारे आदी कार्यकर्तेही मोठया संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यातील केगाव येथे शिंदे यांनी भेट दिली.गावातील माता-भगिनींनी प्रेमानं औक्षण केलं व मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांचा सन्मान केला. गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने मिळणारं प्रेम, आशीर्वाद खरोखर ऊर्जा देणारे आहेत. मायबाप जनतेनं मागील १० वर्षाचा कार्यकाळ पाहता हि निवडणूक “परिवर्तनासाठी” हातात घेतली असल्याची भावाना आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.