सोलापूरजिल्हा परिषदसामाजिक

झेडपीतील इफ्तार पार्टीतून घडले एकात्मतेचे दर्शन

मराठा सेवा संघ शाखेचा सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम

सोलापूर: मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेच्यावतीने रमजाननिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन करण्यांत आले होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांचेहस्ते शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यांत आला.  मराठा सेवा संघ शाखेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन  शेळकंदे, अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, जिल्हा कोषागर अधिकारी सरफराज मोमीन, वरिष्ठ भूवैज्ञानीक मुश्ताक शेख, मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ जी.  के. देशमुख, टी.आर. पाटील शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील, कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, संजय उपरे, रफिक शेख, युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तजवील मुतवल्ली, मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिल जगताप, सचिन जाधव, मुनाफ आडते, आर. एम. काझी, रिआज आतार, एम. ए. शेख, बाबा शेख, यासीन यादगीर, रफीक मुल्ला, विकास भांगे, सचिन घोडके, प्रकाश शेंडगे, प्रविण वाघमारे, राजपाल रणदिवे व बहुसंख्य मुस्लीम अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे, गुलाम दस्तगीर गदवाल, अर्चना निराली, अनिता तुपारे,राजश्री रोजी, स्मिता पोरेडी, छाया क्षीरसागर, रंजना विटकर, वैशाली शिंदे, पुजा हुच्चे, राणी तवटी, इकबाल शेख, मुशीर कलादगी, विनायक कदम, चेतन भोसले सागर शेंडगे भारती धुमाळ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button