अडचणीच्या काळात झेडपी कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स देण्याचे पतसंस्थेचे काम चांगलेच
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केले दोन नंबर पतसंस्थेच्या उपक्रमाचे कौतुक

सोलापूर: मार्च एंडिंगमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा होतो. या दरम्यानच रमजान ईदचा सण आल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होत असतानाच जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक दोनने ऍडव्हान्स लाभांश देऊन ही अडचण सोडवल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
रमजान ईद निमित्त सर्व सभासद व मुस्लिम बांधवांना सालाबादप्रमाणे यंदाही लाभांश्याच्या 75 टक्के प्रमाणे ॲडव्हान्स लाभांश वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी एक लाख 31 हजार 823 रुपये इतक्या रकमेचे लाभांश वाटप करण्यात आले. याप्रसंगी सीईओ आव्हाळे यांनी पतसंस्थेच्या कामकाज सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगले चालले असल्याबाबत समाधान व्यक्त केले. रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन रणजीत घोडके, खजिनदार माने, संचालक गिरीश जाधव, सुधाकर माने- देशमुख, मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे उपस्थित होते.याप्रसंगी सभासद समीर शेख, सामान्य प्रशासन विभागाचे शेख यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी सभासद उपस्थित होते. 21 मुस्लिम समाज बांधवांना त्यांचा सण आनंदाने साजरा करण्यात यावा या हेतूने पतसंस्था क्रमांक दोनच्यावतीने ॲडव्हान्स लाभांशच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.