
सोलापूर : राम सातपुते यांना आमच्या माळशिरस मतदारसंघात आम्ही निवडून दिले. परंतु या माणसाने आमचा विश्वासघात केला. त्यामुळे लोकसभेला या माणसाला निवडून देऊ नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी येथे बोलताना केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारासाठी माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी गुरुवारी मंगळवेढा येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर बोलताना विजयदादा म्हणाले वाटेल ते करा, राम सातपुते हा किती बेशिस्त माणुस आहे हे आम्हाला माहीत आहे. आपल्या मतदारसंघात आम्ही त्यांना निवडुन दिलो. परंतू त्यांनी आमचाच विश्वासघात केला. त्यामुळे लोकसभेला तुम्ही त्यांना निवडुन देऊ नका असे आवाहन केले. विजयदादा यांच्या या बैठकीमुळे मंगळवेढा येथील वातावरण ढवळून निघाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रचार रणांगण सोडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केल्यामुळे चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
काडादी उतरले मैदानात
सिध्देश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा व लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी यांची वडवळ, कुरुल, कोरुवली येथे प्रणितीताई शिंदे यांच्या विजयासाठी जाहीर सभाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाआहे. चिमणी पाडून भाजपाने किती त्रास दिला. यात शेतकरी व कारखान्याचे किती नुकसान केले याची आठवण ठेवून भाजपाला पराभूत करा असे आवाहन काडादी यांनी केले. शुक्रवारी आमदार प्रणिती शिंदे यांची मंद्रूप येथे जाहीर सभा आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व अशोक बिराजदार यांनी या सभेचे आयोजन केले आहे.