सोलापूरआरोग्य

अखेर हेल्थमधील ‘ते” प्रकरण विशाखा समितीकडे

झेडपीच्या प्रशासनाने घेतली गंभीर दखल

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये घडलेले ते लज्जास्पद प्रकरण चौकशीसाठी अक्कलकोट तालुका विशाखा समितीकडे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल झेडपीच्या प्रशासनाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.

अक्कलकोट तालुक्यात नव्याने कार्यरत झालेल्या एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यास लज्जास्पद वागणूक देण्यात आली. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद देण्यात आली नाही त्यामुळे मंत्रालय स्तरावरून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. सीएमओ कार्यालयाकडून तंबी मिळताच आरोग्य विभागातील या प्रकाराची चौकशी सुरू झाली आहे. ‘सोलापूर समाचार” मध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करजखेडे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी कवितके यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विशाखा समितीकडे हे प्रकरण पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील दुधनी विभागातील एक आणखीन गंभीर प्रकरण आहे. हे प्रकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे चौकशीकडे चौकशीसाठी पाठवले होते त्यांनी याबाबत सुनावणी घेतली आहे. त्यावर काय निर्णय झाला हे माहीत नसल्याचेही डॉ. करजखेडे म्हणाले. एकाच तालुक्यात महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे दोन गंभीर प्रकार घडलेल्या असताना आरोग्य विभागाने याकडे का कानाडोळा केला हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर नंतर करमाळा तालुक्यातील जेऊर येथे असे प्रकार घडल्याचे संघटनेने तक्रार केली आहे. आरोग्य संघटनेच्या तक्रारीत अनेक गंभीर मुद्दे आलेले आहेत. 19 एप्रिल रोजी ही तक्रार करण्यात आली त्यानंतर या तक्रारीच्या चौकशीचे काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही. आरोग्य विभागातील सर्वच तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गंभीर दखल घेतल्याचे प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या जिल्हा दौऱ्यावर असल्याने या गंभीर प्रकरणाबाबत त्यांचे अद्याप प्रतिक्रिया मिळालेले नाही.

‘त्या” डॉक्टरांना मिळाले मानधन

राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील 319 डॉक्टरांचे थकलेले मानधन गुरुवारी जमा करण्यात आले आहे. मार्चअखेर पर्यंतचे त्यांचे थकीत मानधन देण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांचेही वेतन उशिरा झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button