सोलापूरसामाजिक

सोलापुरात घरावर उभारला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा

13 एप्रिल रोजी भाग्योदय सोसायटीत होणार अनावरण कार्यक्रम

सोलापूरः भीमसैनिक व बुद्ध अनुयायी अजय जयसिंग भालेराव यांचे निवासस्थानी दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी  ९ वा. महामानव  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुद्धयान महासंघाचे अध्यक्ष भन्ते राजरतन पांचे यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी सोलापुरातील आंबेडकर चळवळीतील व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

सोलापूर जिल्हातील किंबहुना महाराष्ट्रातील पहिल्याच वैयक्तिक वास्तूवरील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम डॉ बाबासाहेव आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात होत असून या अभिनव कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी सर्व सोलापूरवासियांना मिळणार आहे.सोलापूर येथील भाग्योदय सोसायटी येथे राहणारे भीमसैनिक आयु अजय जयसिंग भालेराव यांचे निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेसात फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 13 एप्रिल रोजी होणार आहे.

न्याय, स्वातंत्र्य, समता व ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श आपल्या वास्तूला लागावेत व त्यांचे वैश्विक विचार कायम चिरंतर स्मरणात राहावेत या भावनेतून त्यांनी आपल्या वास्तूवरती डॉ बाबासाहेव आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे स्वप्न पाहिले आणि ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्यां जयंती दिनी 13 एप्रिल 2024 रोजी सत्यात साकारत आहे.

या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी प्राध्यापक व व्याख्याते संघप्रकाश दूडडे सर, प्रसिद्ध निवेदिका व आंबेडकर चळवळीतील अग्रेसर असणाऱ्या प्रा.डॉ अंजनाताई गायकवाड, रिटायर्ड पोलिस उपनिरीक्षक व समता सैनिक दलाचे प्रमुख केरु जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी पूज्य भदंत राजरत्न यांची धममदेसणा होणार आहे. तसेच समता सैनिक दलाची मानवंदना देखील होणार आहे. तरी सोलापूर शहर जिल्हयातील सर्व आंबेडकर व बुद्ध अनुयायांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पुतळा अनावरण नियोजन समितीचे वतीने करण्यात येत आहे. तरी सर्वांनी या पुतळा अनावरण कार्यक्रमसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सह संयोजक अमोल वाघमारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button