
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील लाखो बांधवांनी ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी, कार, मोटरसायकल अशा आपल्या मिळेल त्या वाहनाने लाखोच्या समुदायाने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. यामुळे शनिवारपासून पुणे महामार्ग जाम होण्याची शक्यता आहे
जरांगे पाटील यांच्या आव्हानाला साद घालत मराठा समाजाला 50 टक्केमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जुळे सोलापूर भागातील मराठा बांधवांची बैठक झाली. 20 जानेवारीच्या मुंबईमधील आंदोलनाला जुळे सोलापूर भागातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव जरांगे पाटील यांना साद घालत सोलापुरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या बैठकीला शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. मुंबईला निघणाऱ्या वाहनांना आजच्या बैठकीदरम्यान चलो मुंबई, चलो मुंबई स्टिकर लावण्याचा कार्यक्रम झाला. या बैठकीत अनेक समाज बांधवांनी मुंबई आंदोलनासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. घरात उपलब्ध असलेले वाहन घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातून अनेक समाज बांधवांनी ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, जेसीबीसह आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे. या बैठकीस राजन जाधव, अमोल शिंदे, अनंत जाधव, माऊली पवार, रवी मोहिते, श्रीकांत डांगे, महेश पवार, प्रशांत देशमुख, पोपट भोसले, प्रकाश डांगे, नवनाथ पवार, महेश घाडगे, विकास कदम, वैभव कदम, श्रीहरी माने, रवी भोपळे, अरुण साठे, उदय पाटील, बालाजी वानकर, उमाकांत घुले, तात्या इंगोले, अविनाश गोडसे, बाळासाहेब तकमोगे, गणेश भोसले, पृथ्वीराज पाटील, सचिन पाटील, अभिजीत निचळ, महेश हनमे, दिलीप कदम, उदय डोके, गणेश कदम, अमर नागमोडे, अक्षय बचुटे, पृथ्वीराज पाटील, वैभव कदम, सुरज टोनपे, सचिन आवटे, सुहास डमढेरे, गणेश भोसले, सचिन पाटील, आदेश गोडसे, जन्मजेय निचळ, गिरीराज यादव, उदयसिंह पाटील, औदुंबर शिराळकर, संतोष खरात, चिराग उबाळे, अनंत जाधव, हणमंत पवार, विकास भोपळे, मनोज पवार, महेंद्र ढवण ,सुनंदा साळुंखे मनीषा नलवडे दिपाली भोपळे त्यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.